गुरुवार, ११ जुलै, २०१३

वारी माहुलीची

खूप दिवसापासून करायाचा असणारा माहुली गडाचा ट्रेक करण्याचा योग जुळून आला तो ०७/०७//१३ या दिवशी , मी हर्षदा बरोबर भांडूपवरून वेळेवर ट्रेन पकडली मात्र तरीही सतत काळजी वाटत होती ती पनवेल वरून येणाऱ्या मित्र बद्दल कि त्यांना हे ट्रेन मिळेल की नाही ,सरतेशेवटी धावत -पळत त्यांनीही हि ट्रेन पकडली आणि मग आम्ही सुटकेचा निश्वास टाकला गप्पा -टप्पाच्या  नादात आसनगाव ला कधी पोहोचलो हे कळलंच नाहीआसनगाव स्थानकात भ्रमंती ३६५ चा ग्रुप आमची वाट पाहताच होता थोड्याच वेळात अमेयने सर्वाना नास्तासाठी निघण्याची सूचना केली आणि मग तिकडून सर्वजण नास्तासाठी जवळचा असलेल्या ठिकाणी गेलोतिकडे गीतांजलीने बनवलेल्या मिसळ-पाव वर आम्ही सर्वांनी यतेच्छ ताव मारला . आमचा नास्ता करून झाल्या वर काही वेळातच मागच्या ट्रेन ने मागे राहिलेले आमचे दोन साथीदार आले , अमेयने सांगितल्याप्रमाणे  आम्ही सर्वजण ट्रक मध्ये चढलो आणि मग सुरुवात झाली ती आमच्या माहुली गडाच्या ट्रेकची !!! खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून सतत हलणाऱ्या ट्रक मधून जाताना एक वेगळीच मजा येत होती . सुमारे १५  मिनिटांनी आम्ही माहुलीच्या पायथ्याशी पोहोचलो         पुढील काही वेळातच सर्वांनी आपली ओळख करून दिली . आणि मग अमेयने योग्य त्या सूचना दिल्यानंतर आम्ही गडाकडे आमची आगेकूच चालू केली संपूर्ण परिसर धुक्याने भरून आला होता , हवा अतिशय कुंद झाली होतीअश्या वातावरणात आगेकूच करण्यात मजा  येत होती.पुढे जाताना आम्हाला पहिला ओढा  लागला मग एकमेकांना मदत करत आम्ही तो ओढा पार केला आतापर्यंत आम्ही चालत असलेलो सरळ रस्ता संपून आता चढण चालू झाली होती क़ुन्द हवेतुन पुढे जाताना थकवा वाटत होता.सुमारे अर्ध्या तासाने आम्ही पहिली विश्रांती घेतली .१० मिनिट आराम केल्या नंतर आम्ही पुन्हा मांची आगेकूच चालू केली फोटो-सेशन करत करत आम्ही पुढे निघालो . मात्र पहिलाच ट्रेक करणाऱ्या माझ्या साथीदारांचा हा उत्साह काहीच वेळातच  कमी झाला. मग आपला कॅमेरा फोन आत ठेवून त्यांनी आपले  पूर्ण लक्ष ट्रेक वरच केद्रित केले . मग थोडे अंतर ते पुढे जातपरत पाच मिनिटे बसत आणि मग परत पुढे जायला सुरुवात असा त्यांचा क्रम सुरु झाला्‌ . हवेतील दमटपणामुळे प्रचंड धाप लागत होतीआणि आकाश पूर्णपणे धुक्याने दाटलेले असल्यामुले डोंगरमाथा दिसत नव्हता त्यामुळे अजून किती अंतर कापायचे आहे हे  दिसत नव्हत .  मग माझे साथीदार मला सतत अजून किती वेळ आहे असा प्रश्न विचार आणि मी त्यांना  अजून अर्धा तास , फक्त अर्धा तास असा बोलून त्यांना समजवत होतो. आणि आता आम्हाला वाटत होता कि कधी एकदा वरुणराजा प्रस्सन होतो आणि आम्हाला त्याचं अम्रुत धारांनी तृप्त करतो मात्र वरुणराजा काही प्रसन्न  होत नव्हता .
आणि मग जर वेळाने आम्हाला परत सरळ रस्ता लागला आणि आम्हाला जर बरा वाटल आणि काही क्षणातच प्रचंड हवेचा झोत आला आणि धुक्याने भरलेले आकाश मोकळे झाले आणि मग आम्हाला प्रथम दर्शन झाले ते डोंगरमाथ्यावर वसलेल्या अतिप्रचंड माहुली गडाचे .ते विहंगम दृश्य पाहून अंगात एक चैतन्य संचारले आणि मग आमची पावले झपाझप चालू लागली .                       मग परत लागलेल्या चढणीवरून वाट काढत आम्ही आमची आगेकूच चालूच ठेवली .आम्हाला आमच्या पुढे आगेकूच करणारे अनेक लोक दिसत होतो , पुढे जाणारे लोक त्या अतिप्रचंड डोंगरमाथ्या समोर मुंगी प्रमाणे भासत होते .त्यावेळी मनात विचार आला कि निसर्गापुढे आपण मनुष्य  पामर किती लहान आहोत ते !!! आम्ही झपझप चालत होतो आणि अचानक काही कळायचा आत ढग दाटून आले आणि धो-धो पाऊस सुरु झालामाझ्या  bag ला कवर घालेपर्यंत ती पूर्ण भिजून ओलीचिंब झाली होती..बघता-बघता आम्ही शेवटच्या शिडी पर्यंत पोहोचलो . आता डोंगरमाथा आणि आमच्या मध्ये फक्त एका शिडीचे अंतर होते  आम्ही झपाझप ती शिडी चढून गेलो वरती पोहोचल्यावर जणू मनात जग जिंकल्याच्या आनंद झालांमाहुली गडावरून दिसणारे विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न झाले मानत विचार आला कि 'ह्याज साठी केला होता का अट्टाहास "…… 
            आतापर्यंत प्रचंड भूक लागली होती आम्ही तिकडच्या गवतावर विसावलो , लगेचच आणलेले डबे उघडून आम्ही खायला बसलो हर्षदाने आणलेल्या पावभाजीची आणि शिल्पाने आणलेल्या उत्थपाची चव औरच लागत होती !!! जेवण चालू असतानाच परत एकदा आभाळ भरून आले  पुन्हा पाऊस सुरु झालाचिर-चिर पडणाऱ्या पाऊसात छत्रीखाली जेवण घेताना एक वेगळाच अनुभव येत होता . काही वेळातच आम्ही आमचे जेवण उरकले आणि समोरील गवतावर आडवे झालो.
                      आता पर्यंत आमचे सर्व सहकारी इथपर्यंत पोहोचलो होते .सर्वांचे जेवण झाल्यावर वेळ आली ती माहुली किल्ला फिरण्याची मग आम्ही किल्ला फिरायला निघालो  आमच्यातील काही जणांनी मात्र इकडेच बसून आराम करणाच्या बेत केला . माहुली किल्ल्यावर संपूर्णपणे धुक्याची चादर पसरली होतिचार हात पुढे चालणारा माणूस सुद्धा दिसणे अशक्य झाले होतेजणू स्वर्गात फिरल्याचा भास होत होता . काही अंतर गेल्या वर पुढे आम्हाला एक  छोटाशा धबधबा भेटला मग सर्वांनी त्यात मनसोक्त भिजून घेतले . रोजच्या धाकधुकीच्या  जीवनात आलेला क्षीण त्या अंगावर पडणाऱ्या पाण्यासमवेत निघून जात होता .

          सुमारे एक तासाने आम्ही परत शिडीच्या ठिकाणी पोहोचलो. आता वेळ झाली होती ती परतीच्या प्रवासाची , माहुलीच्या आठवणी मनात साठवत आम्ही गड उतरायला सुरुवात केली . सकाळी चढताना थकलेल्या माझ्या साथीदारांमध्ये पूर्णपणे परिवर्तन घडले होते येताना हत्ती वेगाने चालणारे माझे सहकारी आता उधळलेल्या अश्वाप्रमाणे उतरत होते . येताना सुमारे  तास लागलेले अंतर आम्ही आता केवळ पाउण तासात आम्ही कापले हा हा म्हणता आम्ही पायथ्याशी पोहोचलो मागे वळून माहुली किल्ल्याकडे पाहून मनात विचार आला बघू आता परत कधी योग जुळून येतो तुझ्या भेटीचा , तोपर्यंत मनात आठवणी आहेत  ह्या भेटीच्या !!!!ता क़.
आपला पहिलाच ट्रेक करणारे माझे सहकारी हर्षदा ,शिल्पा आणि रोहित ह्यांनी हा ट्रेक इतक्या सहजपणे केला कि त्यांना बघून कधीच वाटला नाही कि हे आपला पहिला ट्रेक करत आहेत.
शेवटही शिडी चढताना एक तरुण दिसला , तो चक्क स्लीपर घालून उतरत होता , ह्या वरून आजच्या तरुणाईने 'आज कुछ तुफानी करते हें ' हे जर जास्तच मनावर घेतला  आहे असा वाटलाकाही वेळा साठी हरवलेल्या गिरी आणि रोहितमुळे  सार्वजन चिंतातूर झाले होतेयावरून  गोष्ट शिकायला मिळाली कि ट्रेक कोणताही असून दे कधीही ग्रुप ला सोडून मागे अथवा पुढे जावू नये .
येताना ट्रेन मध्ये आम्ही जरी बेसूर आवाजात अंताक्षरी खेळत होतो तरी गीतांजलीने गायलेले "रात के हमसफर " हे गाणे जेव्हा एकले तेव्हा जणू "ऑल इंडिया रेडीओ सुरु झालाच्या भास झाला . मधुर !!!!!!
(फोटो सौजन्य रोहित रोकडे , जाधवांचा अवि आणि दिनेश नवले )